Home क्राईम धावत्या रेल्वेखाली महिलेची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली महिलेची आत्महत्या


Crime

जळगाव प्रतिनिधी । घरातून कोणालाही न सांगता पहाटे 3 वाजता निघालेल्या 48 वर्षीय महिलेने पिंप्राळा रेल्वे गेटजवळ आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आले. रेखा किरण राठोड असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेखा यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा किरण राठोड (वय ४८) रा.पतंग गल्ली, जोशी पेठ या बुधवारी पहाटे तीन वाजता घरातून गेल्या. चार वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली पिंप्राळा रेल्वे गेटजवळ स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह रेल्वे खांब क्रमांक ४१८/ २१ व २३ दरम्यान महिलेचा मृतदेह आढळून आला. जळगाव स्टेशन प्रबंधकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे हे.कॉ.भरत पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पती किरण भगवान राठोड व मुलगा आकाश राठोड यांचा पतंग बनविण्याचा व बूट, चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आकाश, हर्षाली व योगिता या दोन मुली असा परीवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound