जळगाव,प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महापालिकेतर्फे विविध कॉलनी परिसरात जाऊन नागरिकांसाठी अॅन्टीजन टेस्ट कॅम्प घेण्यात येत असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
महापालितर्फे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता उद्या सोमवार दि. १९ एप्रिल रोजी सेंट जोसेफ शाळेजवळ साईबाबा मंदिरामध्ये सकाळी ९.० ते १.० वाजेपर्यंत अॅन्टीनज टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.