नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करण्याऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. .
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही रेमडेसिवीर मिळावे यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. वाढते कोरोना रुग्ण आणि रेमडेसिवीरचा पुरवठा याचे प्रमाण रोजच्या रोज व्यस्त बनत चालले आहे. राज्यात रेमडेसिवीर औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची ससेहोलपट पाहून सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे.
आता कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडने रेमडॅक इंजेक्शनचा दर २८०० रुपयांवरून ८९९ रुपये केला आहे. सिजीन इंटरनॅशनल लिमिटेडनं रेमविन इंजेक्शनचा दर ३९५० रुपयांवरुन २४५० रुपये केला आहे.डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीज लिमिटेडनं रेडिक्स इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून २७०० केला आहे.सिपला लिमिटेडनं सिप्रेमी इंजेक्शनचा दर ४००० रुपयांवरून ३००० रुपये केला आहे.मायलॅन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडनं डेसरेम या इंजेक्शनचा दर ४८०० रुपयांवरून ३४०० केला आहे.ज्युबिलँट जेनेरिक लिमिटेडनं जुबी-आर इंजेक्शनचा दर ४७०० रुपयांवरून ३४०० रुपये केला आहे.हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडनं कोविफोर या इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून ३४९० रुपये इतका केला आहे.“
या इंजेक्शनची साठेबाजी आणि काळ्याबाजाराला आळा घालण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत.