Home Cities अमळनेर आमदार अनिल पाटील यांना पितृशोक

आमदार अनिल पाटील यांना पितृशोक

0
52


अमळनेर प्रतिनिधी । अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे वडील नानासाहेब भाईदास संतोष पाटील यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.

अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे वडील तथा जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांचे सासरे नानासो भाईदास संतोष पाटील (निवृत्त अभियंता सा.बां.विभाग) वय ८६ यांचे आज वृध्दपकाळाने दुःखत निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सध्या सुरू असणार्‍या कोविडची आपत्ती आणि लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भाईदास पाटील यांच्या पार्थिवावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यामुळे कुणीही अंत्ययात्रेसाठी वा त्यानंतर सांत्वनासाठी येऊ नये. आपण सर्वांनी घरीच रहावे आणि सुरक्षीत रहावे असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.

दरम्यान, नानासाहेब भाईदास पाटील यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक वर्तुळातह सर्वसामान्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.


Protected Content

Play sound