जळगाव प्रतिनिधी । जळगावात मृतांची संख्या वाढत असल्याने अत्यंविधीसाठी थांबावे लागत असल्याने एमआयडीसी परिसरात नवीन स्मशानभूमी तयार करण्यात येत आहे. आज दुपारी 1 वाजेपासून या कामाला सुरुवात झाली आहे.
शहरात व जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. नेरी नका स्मशानभूमीत एकाच दिवशी 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे गेल्या दोन दिवसात शहरांमध्ये मृतांचा आकडा 41 वर गेलेला आहे त्यामुळे नेरी नाका स्मशान भूमी वर अंत्यविधीसाठी नागरिकांना व नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागते.
यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमी येथे कोरोना बाधित व संशयित रुग्णावर अत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नाही. यामुळे अंत्यविधीसाठी नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागते ही प्रतीक्षा करावे लागणार म्हणून मनपा प्रशासनाने एमआयडीसी परिसरात नवीन स्मशानभूमीत तयार करण्याच्या कामाला आज दुपारी एक वाजेला सुरुवात केली. यावेळी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी अभियंता अरविंद भोसले, मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी एमआयडीसीमधील एका खुल्या भूखंडाची पाहणी करून त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्मशानभूमीत तयार करण्याचा निर्णय घेतला. या खुल्या भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपाचे शेड तयार करून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड करण्यात येणार आहे. याठिकाणी पाण्याची व्यवस्था महानगरपालिका करणार आहे. या ठिकाणी लोकसहभागातून अंत्यविधीसाठी सात नवीन वोटे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नेरी स्मशानभूमीवर अंत्यविधीसाठी करावी लागणारी प्रतीक्षा आता संपणार आहे.