दिल्लीतही आता विकेण्ड कर्फ्यू

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड कर्फ्यू लावत असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

 

अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टींना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

 

कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत.  चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे.  बाहेर जेवण्याला बंदी असून होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल.

 

 

नायब राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी वीकेण्ड कर्फ्यूची घोषणा केली. दिल्लीमध्ये  बेडची कमतरता नसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी निर्बंधांची कडक अमलबजावणी करणार असल्याचं ते म्हणाले

 

दिल्लीत बुधवारी सर्वाधिक १७ हजार २८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चाकं दिल्लीसाठी चिंतेची बाब असून  दुसऱ्या लाटेचा राज्याला फटका बसला आहे. बुधवारी १०० रुग्णांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा दर १२.४ वरुन १६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीत सध्याच्या घडीला ५० हजार ७३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Protected Content