Home धर्म-समाज चुंचाळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

चुंचाळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
44

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील श्री. संत संताजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य  फाउंडेशन अध्यक्ष अँडश्‍ भरत  चौधरी यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी रहेमान तडवी, सामाजिक कार्यकर्ते हेमंत सावकारे, संजय पाटील,  शिवाजी गजरे , पत्रकार विक्री वानखेडे, पत्रकार दिपक नेवे हे प्रामुख्याने उपस्थित होते. भिम आर्मी सामाजिक संघटना सचिव जळगाव जिल्हा सुपडू संदांनशिव, स्वराज्य  फाउंडेशन अध्यक्ष ॲड. भरत चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्याबद्दल माहिती दिली. आजच्या तरुणांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार व आचार आत्मसात केल्यास हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे सांगुन कोरोना काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना संकटावर मात करण्यासाठी दिलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याची ही याप्रसंगी मान्यवरांनी विनंती केली व प्रत्येक व्याक्तीने आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी व कोरोना आजारांवर मात करण्यासाठी धडे देत साधे पणाने जयंती साजरी केली. या जयंतीच्या कार्यक्रमास चुंचाळे येथील  यांच्यासह ग्रामस्थ  उपस्थित होते.


Protected Content

Play sound