जळगाव, प्रतिनिधी । दोन दिवसांच्या वीक-एंड लॉकडाऊन नंतर आज सकाळी सातपासून निर्बंध तुलनेत शिथील करण्यात आले आहेत. मात्र, पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येऊ नये असे आवाहन केलेले असतांना बाजारपेठेत गर्दी उसळल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. तर नियम न पाळणाऱ्या १६ दुकानांना मनपा प्रशासनातर्फे सील करण्याची कारवाई करण्यात आली.
शासन निर्णयाची प्रतीक्षा असतांना उपायुक्त संतोष वाहुळे यांनी त्यांच्या पथकासह आज विविध व्यापारी संकुलामध्ये पाहणी केली असता त्यांना धक्कादायक प्रकार दिसून आलेत. यात काही महिला लहान लहान बालकांना घेवून खरेदीसाठी आल्याच्या त्यांना आढळून आले. या व्यापारी संकुलांमध्ये सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी झालेली दिसून आली. दुकानांमध्ये गर्दी झाल्याने विविध ठिकाणच्या जवळपास १६ दुकानांना महापालिकेच्या पथकाने सील लावले. यात संत गोधडीवाला मार्केट ९ दुकाने सील करण्यात आली असून तळघरातील दुकांनावर ग्राहकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, या ग्राहकांना समज देण्यात आली. तसेच भाटीया मार्केट -५, चौधरी कॉम्प्लेक्स -१, संत कवरराम मार्केट यथील १ दुकाने सील करण्यात आली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/298435245059789