पाचोरा प्रतिनिधी । उच्च दाबाची तार अचानक पडल्याने ३५ बकर्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज तालुक्यातील नांद्रा येथे घडली.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील नांद्रा येथील रवींद्र देशमुख यांच्या शेतामध्ये राजाराम सखाराम भिल्ल (रा. बांबरूड राणीचे, ता. पाचोरा) यांनी त्यांच्या मालकीच्या बकर्या बसविल्या होती. येथे बकर्यांसाठी तारांचे कंपाऊंड तयार करण्यात आलेले आहे. याच्याच वरून हाय टेन्शन अर्थात उच्च दाबाच्या तारा गेलेल्या आहेत.
आज सकाळी सात वाजेच्या सुमारास वरून गेलेल्या उच्च दाबांच्या तारा खालील तारांवर पडल्या. यामुळे त्या तारांमध्ये विजेचा प्रवाह उतरून ३५ बकर्यांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे बकर्यांवर उदरनिर्वाह करणार्या राजाराम भिल्ल यांची मोठी हानी झाली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/747604839290912