Home Cities जामनेर ‘सावकार जा’ बोलणे भोवले; दोघांकडून तरूणाला बेदम मारहाण व जबरी लुट

‘सावकार जा’ बोलणे भोवले; दोघांकडून तरूणाला बेदम मारहाण व जबरी लुट


जामनेर प्रतिनिधी । दुचाकी स्लीप झाल्याने ‘सावकार जा’ असे सांगणाऱ्या तरूणाला दोघांनी बेदम मारहाण करत तरूणाच्या गळ्यातील सोन्याची चैन व मनगटी घड्याळ काढून जबरी लुट केल्याची घटना खादगाव फाट्याजवळ घडली. याप्रकरणी जामनेर पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण आणि अनिल अरूण जगताप दोन्ही रा. बजरंगपुरा जामनेर हे दोघे ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता दुचाकीने भुसावळ रोडने जात असतांना खादगाव फाट्याजवळ दोघांची दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे तिथे उभा असलेला ज्ञानेश्वर काशिनाथ शिंदे (वय-३२) रा. ओझर खुर्द ता. जामनेर याने पाहिले व सावकार जा असे म्हणाला. हे दोघांना जीव्हारी आल्याने रागाच्या भरात दोघांना ज्ञानेश्वर शिंदे या तरूणाला बेदम मारहाण केली व तरूणच्या गळ्यातील २२ हजार ५०० रूपये किंमतीचा सोन्याची चैन आणि साडेचार हजाराचे मनगटी घड्याळ जबरी काढून पसार झाले. याप्रकरणी ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि किशोर पाटील करीत आहे. 


Protected Content

Play sound