Home Cities जळगाव पिंप्राळा हुडको परिसरातून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

पिंप्राळा हुडको परिसरातून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले


जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. रामानंद नगर पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील गौतम नगर पिंप्राळा हुडको परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडील व भावासोबत राहते. शौचालयाला जावून येते असे आईला सागूंन ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मुलगी घराबाहेर पडली. बराच वेळ झाल्यानंतर मुलगी घरी आली नाही म्हणून आईवडीलांनी शोधाशोध सुरू केली. मुलीने वडीलांना रात्री ८ वाजता अनोळखी नंबरवरून फोन करून थोड्या वेळाने घरी येते असे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याच नंबरवर वारंवार फोन केला असता मोबाईल नंबर स्विचऑफ असल्याचे दिसून आले. नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधून मुलगी मिळून आली नाही. अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहे. 


Protected Content

Play sound