भुसावळात पिंपळाचे झाड कापले ; ठेकेदाराला राजकीय नेत्यांचा आशीर्वाद ?

 

भुसावळ  : प्रतिनिधी । शहरातील सिंधी नॉलॉनी भागातील पिंपळाचे झाड घरमालक आणि ठेकेदाराने प्रशासनाची दिशाभूल करून तोडले असल्याची चर्चा आहे . ठेकेदाराने त्याचा राजकीय प्रभाव मोठा असल्याचे सांगत अरेरावीचा प्रयत्न केल्याने संशय आणखी वाढला आहे

 

शहरातील शिंधी कॉलनी भागातील किरण नारा यांनी सिटी सर्व्हे नंबर ३२६४ मधील पिंपळाचे झाड तोडण्यासाठी ८ जुलै २० १९ रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना अर्ज दिल्याची माहिती दिल्यावरून  १० एप्रिल , २०२१ रोजी ठेकेदार सलिम याने  झाड कापले  याबाबत विचारणा केली असता मालकाने माझ्याकडे नगरपरिषद व पोलीस प्रशासनांची परवानगी असल्याचे  सांगितले  भुसावळतील माजी उपनगराध्यक्ष  युवराज लोणारी यांनी पत्रकारांशी मोबाईल वरून बोलणे करून दिले असता” तुमच्याकडून जे होईल ते करा जे छापायचे आहे ते छापा”असे बोलून राजकीय  प्रभाव दाखवण्याचा  प्रयत्न केला.

 

नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे  किरण शंकरलाल नारा यांनी पिंपळाच झाड तोडण्यासाठी अर्ज दिल्याची माहिती त्यांनी व  ठेकेदाराने पत्रकारांना  दिली.नगरपरिषदेचे लेटरहेडवर परवानगी देण्यात आल्याचे पत्र दाखविले.त्या पत्रावर नगरपरिषदेचा  शिक्का व संबंधित अधिकाऱ्यांची सही दिसत नव्हती.कदाचित दिशाभूल करण्यासाठी ते पत्र तयार करण्यात आले असावे . आमच्याकडे पोलिस  परवानगी  , वीज पुरवठा खंडित करण्याचीसुद्धा परवानगी आहे असे ते म्हणाले

 

नगरपरिषदेचे संदीप चिंद्रवार यांनी  सोमवारी तपास करून सांगेल अशी माहिती दिली. सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाँडक यांनी  आमच्याकडे कुठलीही परवानगी घेण्यासाठी कुठलाही व्यक्ती आलेला नाही व आमच्या कार्यालयाकडून कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही असे सांगितले .

 

महावितरण कम्पनीकडून सविस्तर माहिती मिळू शकली नाही .पण त्या प्रभागातील वीज पुरवठा चार तास खंडित करण्यात आल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि  नगरपरिषदेने  आमच्या कार्यालयाकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र द्यावे आम्ही  कारवाई  करू .

 

Protected Content