Home Cities यावल दहिगावातील खळवाडीत आग

दहिगावातील खळवाडीत आग

0
47


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील कोरड्या विहिरीत असणार्‍या कचर्‍याला आग लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले.

दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील कोरड्या विहीरीला अचानक आग लागली. ही घटना रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. यावल नगरपालिकेचे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. यामुळे ही आग आटोक्यात आली आणि सुदैवाने पुढील अनर्थ टळला. घटनास्थळी माजी जि. प. सदस्य सुरेश पाटील, उपसरपंच देवीदास पाटील, माजी सरपंच दिलीप पाटील, रमेश महाजन यांच्यासह गावकर्‍यांनी धाव घेत आग विझवण्यासाठी मदत केली. याचवेळी वारा असता तर फार मोठा अनर्थ घडला असता असे बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound