चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मुंदखेडा येथे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख ७ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील मुंदखेडा येथील रहिवाशी रत्नाबाई प्रल्हाद पाटील (वय-५०) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. २४ मार्च रोजी त्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागचा दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले ५० हजार रूपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख ७ हजार रूपयांचा मुद्देमाल पोबारा केला. २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता घरी आल्या असता घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र साळुंखे करीत आहे.