Home क्राईम सावद्यात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक, दोन फरार

सावद्यात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक, दोन फरार

0
35


सावदा प्रतिनिधी । घातक शास्त्रांसह दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या टोळीचा सावदा पोलीसांनी पर्दाफाश केला असून टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्तूल, मिरचीची पुड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सावदा पोलीसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास चार-पाच जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांना मिळाली. त्यानुसार सावदा पोलीसांनी सापळा रचून तीन जणांना अटक केली आहे. यातील दोन संशयित आरोपी फरार झाले आहे. मुजाहीद खान उर्फ माया उर्फ मुज्जू इब्राहीम खान (वय-२६) रा. मदीना मजिद जवळ बुरहानपुर (मध्यप्रदेश), शेख रईस उर्फ मास शेख ईस्माईल (वय-२८) रा. ख्वॉजा नगर सावदा आणि राहुल वाल्मिक आदीवाल (वय-२६) रा. वाघोदा बु॥ ता. रावेर अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल, लोखंडीरॉड आणि मिरचीची पुड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील गोलु पठाण बुरान तडवी आणि शेख शाहरूख (पुर्ण नाव माहित नाही) हे दोघे पोलीसांना पाहून पसार झाले आहे. याप्रकरणी पोहेकॉ उमेश अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करीत आहे. 


Protected Content

Play sound