चाळीसगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षच्या ४१व्या स्थापना दिनानिमित्त चाळीसगाव येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात खासदार उन्मेष पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी करण्यात आली. आज भारतीय जनता पार्टीच्या ४१ व्या स्थापना दिन असल्याने येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात स्व. पंडीत दीनदयाळ उपाध्याय, स्व. शामा प्रसाद मुखर्जी, भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशी घोषणा देत जल्लोषात दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्धा म्हणून डॉ.राहुल देव वाघ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के.बी.साळुंखे, पं.स. माजी सभापती स्मितल बोरसे, पं.स. माजी सदस्य दिनेश बोरसे, माजी पं.स. सदस्य रविंद्र चौधरी, माजी सरपंच रवि जामदेकर, संजय चौधरी, शेषराव चव्हाण, बबडी शेख, अमीत सुराणा व कार्यकर्ते उपस्थित होते.