संत गोपाल चैतन्यजी महाराज यांनी करून घेतले लसीकरण

 

रावेर, प्रतिनिधी  । जगभरात हाहाकार माजवीणाऱ्या कोरोना या महामारीला आळा घालण्याकरिता भारत सरकारने निर्माण केलेल्या को वैक्सीन लसीकरण संजीवनी ठरत असून संत संत गोपाल चैतन्यजी महाराज यांनी पाल येथे  लसीकरण करून घेतले.

को वैक्सीन लसीकरणाचा  लाभ देशभरातील  सर्व जनतेने घ्यावा  आणि या कोरोना महामारीचा नायनाट करावा असे आवाहन  श्री वृंदावन धाम आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी स्वतः  पाल ग्रामीण रुग्णालयात रावेर तालुक्यातील पत्रकारा समेत लसिकरण घेऊन आवाहन केले. याप्रसंगी  श्रधेय महाराजजी यांनी या कोरोना काळात जीवाची पर्वा न करता वेळोवेळी वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यन्त बातमी प्रसिद्ध करुन या महामारीपासून लोकांना सावध राहण्याचे कार्य पत्रकार बांधव करित आहेत. त्यांनी  सुद्धा स्वतःचे रक्षणा करिता कोवाक्सिनचा लाभ घ्यावा.  रुग्णालयात सेवा बजावीणाऱ्या कर्मचारी अधिकारीच्या कार्याची स्तुति करित पाल परिसरातिल ४५ वर्षावरिल सर्व लोकांनी या को वैक्सीन लसिकरण घेऊन कोरोना महामारीपासून निरोगी रहावे असे आवाहन केले. या वेळी श्रधेय गोपाल चैतन्य महाराज जी समेत पाल आश्रमाचे ब्रम्हचारी ऋषि चैतन्यजी महाराज, हरीश चैतन्यजी महाराज तसेच रावेर तालुक्यातील पत्रकार देवलाल पाटिल, दीपक नगरे,  जयंत भागवत, सतीश नाईक, सुनील चौधरी, राजेन्द्र अटकाले,  पिंटू महाजन, रमेश महाजन,  योगेश महाजन, सुरेश पवार, गणेश भोई,  भीका सालूके, छोटूलाल चव्हाण, आदी उपस्थित होते.

 

Protected Content