जळगाव : प्रतिनिधी । शहरातील रिक्षांचे मीटर्स पल्स वाढविण्यासाठीची २ हजारांची सक्ती रद्द करावी अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे
वीर सावरकर रिक्षा युनियन खोटे नगर स्टाॅप संघटनेचे पदाधिकारी गोपाळ अहिरे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत सांगितले की , कोरोनामुळे आणि इंधन भाववाढीमुळे २ वर्षांपासून शहरातील रिक्षाचालक मेटाकुटीला आले आहेत वर्षभरापासून तर व्यवसाय ठप्प आहे. आम्ही कसा तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहोत त्यातच आरटीओ कार्यालयाकडून पासिंगला येणाऱ्या रिक्षाचालकांकडून मीटर्स प्लस वाढीसाठी २ हजार रुपये घेतले जात आहेत. मीटर्सची सक्ती केली जाते आहे अशी सक्ती या शहरात नको होती कारण जळगाव शहर मेट्रोसिटी म्हणजे मोठे महानगर नाही येथे आमचा व्यवसाय जेमतेम चालतो प्रादेशिक परिवहन खात्याचे अधिकारी श्याम लोही यांनी त्याची जाणीव असायला पाहिजे होती. राज्य सरकारचा या वसुलीचा आदेश असला तरी या शहराचे वास्तव सरकारला सांगून त्यांनी ही २ हजार रुपयांची सक्ती त्यांनी रद्द करायला सांगायला पाहिजे होती. मीटर्स सक्ती करायला नको होती. लोही यांनी या शहराचा वास्तव अभ्यास केला नाही , रिक्षाचालकांच्या कोणत्याच संघटनेशी चर्चा केली नाही आणि राज्य सरकारचा आला तसा आदेश लागू करून टाकला .
सरकार आमच्या मागण्यांचा काहीच विचार करीत नाही आम्ही आमच्या संघटनेचे स्थानिक अध्यक्ष दिलीप सपकाळे , मुकेश चौधरी , भास्कर मते यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा आमच्या मागण्या परिवहन मंत्र्यांपर्यंत पोहचवल्या. मात्र काहीही उपयोग झाला नाही ही २ हजारांची सक्ती मागे घ्यावी , कोरोनाकाळात सध्या सुरु असलेली उपासमार थांबावी म्हणून आम्हाला मदत द्यावी अशी आमची मागणी आहे . सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करायचे असते म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा टाकला जातो तसे आमच्याही खात्यावर टाका आम्ही कर भरतो म्हणून सरकार चालते हे विसरू नका कारण राज्यात रिक्षाचालकांची संख्या २ लाखांपेक्षाही जास्त आहे. आम्हाला माध्यमे विचारात नाहीत कारण आम्ही संघटित नसल्याने आमचा प्रभाव नाही असे त्यांना वाटते आम्ही या परिस्थितीमध्ये सामूहिक आत्महत्या कराव्या का? असा आमचा यंत्रणेला प्रश्न आहे आमचा लढा सुरु राहील असेही ते म्हणाले . सध्या आम्ही बेमुदत संपावर जाण्याच्या विचारात आहोत असे यावेळी मुकेश चौधरी यांनी सांगितले. याप्रसंगी गणेश राऊत, विनोद गुजर, ज्ञानेश्वर पाटील, भास्कर मते, सुरेश बडगुजर, अनिल पाटील, विरू गुरज, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/508450067205078