रावेर प्रतिनिधी । येथील महसूल खात्याच्या पथकाने गौण खनिजाची चोरी करणार्या ट्रॅक्टर व ट्रॉलीस जप्त केले आहे.
रावेर महसूल पथकाने आज रात्री एक वाजता तर पहाटे सहा वाजता प्रत्येकी एक अश्या दोन अवैध गौण खनिज वाहतुक करणार्या ट्रॅक्टर-टॉलीवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे.
महसूल वसूलीत बरेच मागे पडलेले रावेर महसूल विभाग मार्चच्या अखेरीस अॅक्शन मोडवर दिसत आहे. या अनुषंगाने रात्री एकच्या सुमारास थोरगव्हाण ते सावदा रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतुक करणारे ट्रॅक्टर जप्त करून सावदा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.
तर दुसर्या कारवाईत पहाटे सहाच्या सुमारास रावेर जवळ ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त करण्यात आली. या पथकात मंडळ अधिकारी सावदा,मंडळ अधिकारी खिरोदा , तलाठी खिर्डी, तलाठी खिरोदा, तलाठी विवारा, तालाठी वाघोदा, तलाठी निंभोरा, तलाठी सवखेडा, तलाठी गाते, तलाठी कांडवेल, तलाठी बलवाडी, तलाठी ऐनपूर, कोतवाल थेरोळा यांचा समावेश होता.