Home Cities अमळनेर मद्यपान करून गोंधळ घालणारे शिक्षक अटकेत

मद्यपान करून गोंधळ घालणारे शिक्षक अटकेत

0
45

अमळनेर प्रतिनिधी । निवडणुकीच्या प्रशिक्षणाच्या वेळी दारू पिऊन गोंधळ घालणाच्या दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज सानेगुरुजी विद्यालयात लोकसभा निवडणुकीचे इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण सुरू होते. त्यावेळी वावडे येथील बी. बी. ठाकरे माध्यमिक विद्यालयाच्या राजू रतन पारधी व कल्पेश ज्ञानेश्‍वर गुजर यांना खोली क्र १९ मध्ये प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार ज्योती देवरे हे कक्षात गेले असता दोन्ही शिक्षक आढळून आले नाही. त्यावेळी ते खोली क्रमांक १८ मध्ये गोंधळ घालताना आढळून आले. त्यानी मद्यप्राशन केल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी नायब तहसीलदार अजबसिंग जयवंत वळवी यांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वळवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound