यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चुंचाळे येथे दि.२५ मार्च पासून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील व डॉ.स्वाती कवाडीवले यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य तपासणी उपक्रमास पुन्हा सुरुवात झाली आहे.
राज्यात आणी जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्ग आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरोघरी आशा वर्कर, शिक्षक ,अंगणवाडी सेविका यांच्या दोन पथक चुंचाळे व एक पथक बोराळे गावात जाऊन प्रत्येक घरा- घरात प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य तपासून कोरोना संशयित रुग्ण शोधून त्यांना पुढील तपासणी साठी साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवीत आहे.त्याचबरोबर अँटीजन टेस्ट करणे ही सुरू आहे.
ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण निघेल त्या भागात नागरिकांची आरोग्य तपासणी व जास्तीत जास्त टेस्ट करण्याचे काम प्राथमिकआरोग्य केंद्र अंतर्गत करणे चालू आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही सुरू आहेच.तरी सर्वाना साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी आलेल्या पथकास सहकार्य करा व कोरोनाचे लक्षण असल्यास टेस्ट करून घ्या व प्रशासनाला सहकार्य करा आपल्या गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी हातभार प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे व साकळी आरोग्य प्रशासनातर्फ डॉ.सागर पाटील व डॉ.स्वाती कवडीवाले, बोराळे येथील ग्रामसेवक राजू तडवी, चुंचाळे येथील ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर, यांनी केले आहे.
या कामी आशा स्वंयमसेविका जयश्री चौधरी,सलीमा तडवी, शिक्षक मजित तडवी, राजु सोनवणे,प्रंशात सोनवणे, अंगणवाडी सेवीका लतीका कोळी.बोराळे आशा वर्कर सुनयना राजपुत यांच्या सोबत गावातील युवक मंडळी परिश्रम घेत आहे . आदीवासी समाजाचे जेष्ठ कार्यकर्त व मसाकाचे संचालक नथ्थु रमजान तडवी आदींनी आपल्या आरोग्याची तपासणी करीत पथकास सहकार्य केले व नागरीकांनी देखील कुठलीही भिती न बाळगता आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले .