Home Cities जळगाव अतिक्रमण निर्मुलन पथकाद्वारे सूडबुद्धीने कारवाईचा आरोप : महापौरांची घटनास्थळी भेट (व्हिडिओ)

अतिक्रमण निर्मुलन पथकाद्वारे सूडबुद्धीने कारवाईचा आरोप : महापौरांची घटनास्थळी भेट (व्हिडिओ)

0
39


 

जळगाव, प्रतिनिधी । आज दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने गोलाणी मार्केट जवळील शितल कलेक्शन समोरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यावर हेतुपुरस्सर कारवाई करण्यात येत असल्याची तक्रार या विक्रेत्यांनी महापौर यांच्याकडे निवेदनाद्वारे करून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. दरम्यान, महापौरांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

मागील चार ते पाच महिन्यांपासून अतिक्रमण निर्मुलन पथक सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप या विक्रेत्यांनी महापौर सौ. जयश्री महाजन यांना भेटून केला आहे.  याबाबत आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट नाकारली असून त्यांनी उपायुक्तांना भेटण्याबाबत सांगितले असल्याचे या विक्रेत्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. अतिक्रमण निर्मुलन पथकाच्या कारवाईत मालाचे नुकसान झाले आहे. या वारंवार करण्यात येत असणाऱ्या कारवाईने आर्थिक झळ सोसावी लागत असल्याची कैफियत मांडून निवेदन दिले. निवेदनावर महेश ठाकूर, कुणाल रामावत, निलेश प्रजापत, आकाश दुबे आदींची स्वाक्षरी आहे.  दरम्यान, महापौर सौ. जयश्री महाजन यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेत मदत करण्याचे आश्वसन दिले. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/289019559262994

 


Protected Content

Play sound