नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहाय्य द्या : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मागणी

 

जळगाव, प्रतिनिधी ।  जिल्ह्यात अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे  पिकांचे नुकसान झालं असून याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहाय्य जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे प्रांत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे  पिकांचे नुकसान झालं असून शासनाने सर्वेक्षण करून, आपत्ती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहायता त्वरित  जाहीर करावी.  त्यासाठी नुकसान झालेले शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे  आज सोमवार दि. २२ मार्च रोजी  जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील  यांच्या  नेतृत्वात  प्रांत अधिकारी श्री. भारदे यांची भेट घेऊन करण्यात आली.  याप्रसंगी   महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, वंदना  चौधरी    शकीला तडवी,  अशोक लाडवनजारी,  सुनील माळी,  अशोक पाटील, अरविंद मानकरी, जय श्री उमेश पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content