जळगाव प्रतिनिधी । खासगी रूग्णालयात ऑक्सीजनची कमतरता पडत ऑक्सीजन पुरवठादारांनी ऑक्सीजन पुरवठा नियमित व तात्काळ करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज आदेशात दिले आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढ होत असल्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करत आलेल्या रुग्णांवर वेळेवर व नियमित मेडिकल ऑक्सिजन पुरवठा होणे आवश्यक आहे. तथापि शहरातील व जिल्ह्यातील काही खाजगी ऑक्सीजन पुरवठादार यांच्याकडून रुग्णालयांना त्यांच्या मागणी व आवश्यकतेनुसार नियमित व तत्काळ ऑक्सिजन पुरवठा केला जात नसल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहेत, वेळेवर रुग्णांवर ऑक्सिजन न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने ऑक्सीजन पुरवठादारांनी खाजगी रुग्णालयांना नियमित व तात्काळ मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे. ऑक्सीजन पुरवठा करण्यास टाळाटाळ व दिरंगाई करताना आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज आदेश काढले आहेत.