Home amalner अमळनेर शहरात फरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी; पोलीसात गुन्हा

अमळनेर शहरात फरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी; पोलीसात गुन्हा


अमळनेर प्रतिनिधी । शहरातील पिंपळे रोडवरील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या चांदीच्या दागिने असा एकुण ४९ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुश काशीनाथ सोनवणे (वय-३२) रा. आनंद नगर पिंपळे रोड अमळनेर हे फोटोग्राफीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. १४ मार्च रोजी घराला कुलुप लावून कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. १४ मार्च रोजी ते १५ मार्च रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने  असा एकुण ४९ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापु साळुंखे करीत आहे. 


Protected Content

Play sound