वर्डी गावात दोन ठिकाणी घरफोडी; ४ लाखाचा मुद्देमाल लंपास

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वर्डी येथील शेतकऱ्याच्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शिरून घरातील रोकड सह सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ४ लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुनिल उत्तम पाटील (वय-४०) रा. वर्डी ता. चोपडा हे शेतीचे काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. १५ मार्च रोजी रात्री १० वाजता सर्वजण जेवण करून घराला कडी लावून घराच्या अंगणात झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या दरवाजातून आत प्रवेश करत कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने आणि ४० हजार रूपये रोख तसेच शेजारी राहणारे रघुनाथ पाटील यांच्या घरातील ५० हजार रूपये रोख आणि २० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण ४ लाख ११ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार १६ मार्च रोजी सकाळी ५ वाजता लक्षात आला. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात सुनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुळे बयास करीत आहे. 

 

Protected Content