Home Cities चोपडा सहाय्यक फौजदार उत्तम पाटील सेवानिवृत्त

सहाय्यक फौजदार उत्तम पाटील सेवानिवृत्त


जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस प्रशासनात गेल्या 38 वर्षापासून सेवा बजावित असलेले सहाय्यक फौजदार उत्तम भिवसन पाटील हे शनिवारी सेवानिवृत्त झाले. पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांना सेवानिवृत्ती प्रदान करण्यात आली. सेवापूर्तीनिमित्त पाटील यांच्या कुटूंबियांनी त्यांची घोड्याच्या बग्गीतून जंगी मिरवणूक काढली होती.

 

चोपडा तालुक्यातील मजरेहोळ येथील मूळ रहिवासी असलेले उत्तम भिवसन पाटील हे जळगाव पोलीस मुख्यालयात 23 डिसेंबर 1980 रोजी रूजू झाले होते. 39 वर्षात त्यांनी भडगाव, जिल्हापेठ पो.स्टे, नशिराबाद, अमळनेर, भुसावळ बाजारपेठ आणि पोलीस मुख्यालय जळगाव याठिकाणी सेवा बजावली. शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांच्यासह अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सहाय्यक फौजदार उत्तम पाटील यांना प्रशंसापत्र देवून निरोप देण्यात आला. कार्यक्रमानंतर उत्तम पाटील यांच्या कुटूंबियांनी त्यांना बग्गीमध्ये बसवित वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound