Home क्राईम विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर शनीपेठ पोलीसात गुन्हा

विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर शनीपेठ पोलीसात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । रामपेठेत राहणाऱ्या राहणाऱ्या विवाहितेच्या व्हॉटसॲप नंबरवर अज्ञात व्यक्तीने अश्लिल मॅसेज, व्हिडीओ आणि फोटो टाकल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून आज १० मार्च रोजी शनीपेठ पोलीसात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील अयोध्या नगरातील विवाहिता ही रामपेठेत राहणाऱ्या बहिणीकडे ७ मार्च रोजी आल्या होत्या. ७ मार्च ते ९ मार्च दरम्यान अनोळखी मोबाईल क्रमांकावरून विवाहितेच्या व्हॉटस्ॲप क्रमांकावर अश्लिल मॅसेज, व्हिडीओ आणि फोटो पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी विवाहितेने शनीपेठ पोलीसात धाव घेवून अनोळखी व्यक्ती विरूध्द तक्रार दाखल केली. विवाहितेच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरूध्द विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.


Protected Content

Play sound