यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातुन तथा केन्द्र शासनाच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मका, बाजरी, ज्वारीच्या खरेदी केलेल्या धान्याची १० कोटी ८२ लाख ३७ हजार रूपयांची रक्कम ही १७१३ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहीती वि. का. सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी दिली आहे.
कोरोना संकटाच्या काळात आधीच संकटात सापडलेले शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी जेणे करून त्यांना सहकार्य करता येईल. नाफेडच्या माध्यमातुन हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आपणास मिळाला होता. पण त्यापैक्की पन्नास टक्केच ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकरी बांधवांचा धान्य आम्हास खरेदी करता आला, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये शासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. शासन खरेदी व बाजार भावच्या तुलनेत खरेदीचा जो फरक शासनाने शेतकऱ्यांद्यावा अशी ही मागणी होत आहे. खरिपाची ऑनलाईन नोंदणीस सुरुवात झाली असून, ही नोंदणी करीत असतांना खुल्या बाजाराचा भाव देखील जाहीर झाल्याने शेतकऱ्यांनी जर शासनाच्या या हमीभाव धान्य खरेदीकडे पाठ फिरवली तर विकास सोसायटीच्या माध्यमातुन होत असलेली ऑनलाईन नोदंणीची प्रक्रीया व त्यास लागणाऱ्या परिश्रम वेळ आणि खर्चाचा भुर्दंड हा विकास सोसायटीस बसणार आहे. यासाठी शासनाने काही तरी उपाय योजना करावी अशी मागणी कोरपावली विकास सोसायटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनकडे करणार असल्याचीही माहीती सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/269445071287598