Home Cities जळगाव नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईसाठी थेट जिल्हाधिकारी व एसपी मैदानात !

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईसाठी थेट जिल्हाधिकारी व एसपी मैदानात !

0
24

जळगाव प्रतिनिधी । प्रशासन प्रयत्न करत असतांनाही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे पाहून आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वत: शहरात फिरून कारवाई केली.

जिल्हाधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर थेट स्वत: मैदानात उतरून कारवाई केली होती. यानंतर आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरात फिरून विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई केली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, वाहतूक शाखेचे निरिक्षक देवीदास कुनगर व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.

शहरातील चित्रा चौक, गोलाणी मार्केट परिसरासह अन्य भागांमध्ये आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.


Protected Content

Play sound