Home क्राईम महिला दिनी चिमुकली बनली एका दिवसाची सहाय्यक पोलीस निरीक्षक

महिला दिनी चिमुकली बनली एका दिवसाची सहाय्यक पोलीस निरीक्षक


पाचोरा प्रतिनिधी । महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस ठाण्यात चिमुकलीने एकाच दिवसाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक खुर्चीचा पदभार घेतला. पोलीस प्रशासनाचे काम कसे चालते यासंदर्भात माहिती जाणून घेतली.

पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे लहान मुलींना व महिलांना पोलिस स्टेशनचे कामकाज कसे चालते, याबाबत पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांनी माहिती दिली.  यावेळी लहान मुलींची पोलिस ठाण्यास भेट घडवून पोलिस अधिकार्‍याच्या खुर्चीवर बसून काही काळासाठी पोलीस असल्याचा अनुभवही एका चिमुकलीने घेतला. यावेळी महिलांचा पोलिस स्टेशनतर्फे सत्कार देखील करण्यात आला.


Protected Content

Play sound