खामगाव प्रतिनिधी । पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी कर वाढ करुन दिवसाढवळ्या जनतेच्या कश्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारु आहे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
दि. 05 मार्च 2021 रोजी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सुचनेवरुन पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करण्यासाठी बैलजोडीला चारचाकी वाहन बांधून मोदी सरकारचा निशेध करण्यात आला त्याप्रसंगी त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. यावेळी खामगांव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार,षेगांव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, नगरसेवक किषोरआप्पा भोसले, नगरसेवक अब्दुल रषीद अब्दुल लतीफ, युवक कॉग्रेसचे महासचिव तुशार चंदेल, माजी जि.प.सभापती सुरेषभाऊ वनारे,कृ.उ.बा.स.चे माजी मुख्य प्रषासक पंजाबरावदादा देषमुख, अल्पसंख्यांक सेलचे षहर अध्यक्ष बबलु पठान, महाराश्ट्र प्रदेष कॉग्रेस कमिटी महासचिव,सोषल मिडीया विभागाचे आकाष जैस्वाल, एनएसयुआयचे षहर अध्यक्ष रोहित राजपुत यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, देशभरामध्ये काही ठिकाणी पेट्रोल व डिझेलच्या किंमती 100 रुपयांच्या जवळपास गेल्या आहे. इंधन दरवाढीत मोदी सरकारने इतिहास रचला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे बळीराजासह सर्व सामान्य जनतेला कोरोनासह महागाईच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. इंधन दरवाढीला केवळ केंद्र सरकारच जबाबदार आहे. गेल्या वर्शभरापासून देषात असुरु असलेल्या कोरोनाच्या संसर्गाचे संकट अद्याप टळलेले नाही.आंतराश्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असतांना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करुन लुट करत आहे. त्यात आणाख्ी 18 रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर 4 रुपये कृशी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांषिवाय पेट्रोलची कंमत 32 रुपये 72 पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 33 रुपये 46 पैसे प्रति लिटर आहे. परंतू मोदी सरकारने इंधनावर एक्साईज डयूटी लावून पेट्रोलचे दर 100 रुपये आणि डिझेलचे दर 90 रुपये लिटरपर्यंत वाढवलेले आहे. तसेच एलपीजी गॅस सिलींडरच्या दरात भरमसाठ वाढ केली असल्यामुळे जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोश असून केंद्र सरकारने निर्लज्जपणाचे सर्व मर्यादा पार केल्या आहे. जनता महागाईने होरपळून गेली आहे. ही दरवाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी असून यामुळे देशभरामध्ये केंद्र सरकारविरुध्द नागरीकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.या प्रकरणी जातीने लक्ष घालुन पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी करावे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बुलडाणा रोडवरील वरील पेट्रोलपंपावर जावुन बैलजोडीला चारचाकी वाहन बांधून मोदी सरकारचा निशेध करण्यात आला तसेच पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढ कमी करण्याची मोदींना सुबुध्दी देण्यासाठी केली मोदीच्या फलकाची आरती करुन हाताला काळया फिती बांधुन मोदी सरकारचा जाहिर निशेध करण्यात आला. तसेच हातामध्ये मोदीचा निशेध करणारे व्यंगचित्राचे फलक घेऊन,पेट्रोल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. यावेळी भाजपा भगाव-देष बचाव, फेकू भगाओ-देष बचाव, निषेध असो निषेध असो-भाजपा सरकारचा निषेध असो,जनतेचा विष्वासघात करणाÚया मोदी सरकारचा निशेध असो, भाजपा हाय-हाय, मोदी सरकार हाय-हाय, पेट्रोल-डिझेल व गॅसची दरवाढ कमी करा, ये कमाल है कमल का ,अबकी बार बिकेंगी कार, अबकी बार महंगाई की मार, अषा घोषणा देऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.सोषल डिस्टसिंग पाळून, सर्वांनी मास्क लावुन आणि सॅनीटायझरचा वापर करुन षासनाने दिलेल्या निर्देषाचे पालन करुन अभिनव आंदोलन माजी अमादार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. या मोर्चामध्ये काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. तद्नंतर निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी,खामगांव यांच्या मार्फत पंतप्रधान मोदींना पाठविण्यात आली.या निवेदनावर काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते व षेकडो नागरिकांच्या सहया आहे.
यावेळी खामगांव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मंगेष इंगळे,सुटाळा बु.चे सरपंच निलेष देषमुख, पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, राजेष गव्हांदे, मनोज वानखडे, प्रविण वाकोडे, वैभव काळे, गणेष टाले, प्रदिप दांडगे, नितीन पाचपांडे, गोपाल उज्जैनकर, जयेष वावगे, महेंद्र भोजने, अनंत षेळके, सुरेष डुकरे, संजय अप्तुरकार, परवेज खान, ज्ञानेष्वर षेजोळे, षेख कलीम, मनिश ठाकरे,षेख इम्रान, षिवषंकर टेरे, गणेष बोचरे, भगवानसिंह पडवाळ, षेख कयुम, पंकज गिरी, षुभम मिश्रा, गणेष पाटील, षेरु चैधरी, अस्लम पटेल, फुलसिंग चव्हाण,निलेष ढेंगे, गोविंदा वाघ, पुंडलीक ढेंगे,तानाजी नाईक, अभिशेक जुनघरे, विनोद मिरगे, मनिश ठाकरे,राजु कवळे, षेख इम्रान,दौलत सोनाजी बोर्डे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते