किनगाव अपघातात मृत्यु झालेल्या १४ मजूरांच्या वारसांना २८ लाखाची मदत

रावेर प्रतिनिधी । बुऱ्‍हानपुर-अंकलेश्वर महामार्गावर किनगाव नजिक १४ मजूरांचा मृत्यु झाला होता. त्यांच्या परीवाराला मदत म्हणून आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन प्रत्येकी दोन लाखाप्रमाणे २८ लाखाचे धनादेश तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.

आभोडा येथे किनगाव अपघातात मयत झालेल्या मजूरांच्या वारसाला आज सिम फंडातुन मदत करण्यात आली यामध्ये हुसेन शेरखा तडवी यांची पत्नी आणि मुलाचा त्या अपघातात मृत्यु झाला होता.यांना चार लाखाची मदत करण्यात आली आहे.तर समाधान वाघ वय १० याचे आई-वडील आणि भाऊ’चा त्या अपघातात मृत्यु झाला होता. त्याला सहा लाखाची मदत करण्यात आली. दिपिका मोरे वय ९ हिचे आई,भाऊ आणि बहिनीचा त्या अपघातात  मृत्यु झाला होता.तीला सहा लाखाची मदत करण्यात आली आहे. संजना सपकाळे वय ४० यांचे पतीचा अपघातात मृत्यु झाला होता. त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली आहे.

 आरीफा हुसेन वय ३१ यांचा पतीचा त्या अपघातात मृत्यु झाला होता.त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली आहे. अनिसा तडवी यांच्या पतीचा अपघातात मृत्यु झाला होता त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली आहे. वानम वाघ वय ७५ यांच्या मुलाचा अपघातात  मृत्यु झाला होता.त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली आहे.शांताबाई भालेराव वय५६ यांची मुलगा व सुन यांचा अपघातात मृत्यु झाला होता त्यांना चार लाखाची मदत करण्यात आली आहे.असे एकूण १४ जणांच्या परिवाराला २८ लाखाची मदत करण्यात आली आहे.

अनाथ दिपिका.. खुशीच्या नावे फिक्स डिपॉझीट 

आभोडा येथील दिपिका आणि खुशीच्या जिवनात कायमची खुशी निघुन गेली असून अनाथ झालेल्या दोघे बहीनीच्या नावे सानुग्रह अनुदान त्या १८ वर्षाच्या होईल तो पर्यंत पोष्टात फिक्स डिपॉझीट करण्याचे चांगले काम तहसिलदार यांनी केले आहे.यावेळी धनजंय चौधरी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील कॉग्रेसचे राजूभाऊ सवर्णे ,प्रल्हाद महाजन,संतोष पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content