जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील विरवली गावातील शेतकऱ्याचे जमीनविक्री केल्यासंदर्भातील केस भुसावळ न्यायालयात प्रकरण दाखल असतांना जुलग श्रीनिवास पाटील याने खरेदीखतावर गट नंबर बदलवून बनावट सह्याचा वापर करून जमीन बिनशेतीसाठी प्रकरण मंजूर करून फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजीराव प्रेमचंद पाटील रा. विरवली ता. यावल हे शेती काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी २०१४ मध्ये विरवली शिवारातील गट नं. ८ मधील शेती सौदापावती करून जुगल श्रीनिवास पाटील यांना विक्री केली होती. परंतू जुलग पाटील यांनी खरेदीखतावर गट नं. ८ च्या ऐवजी गट नं. ३०८ असे करून त्यातील १ हेक्टर ३४.५ एवढी जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. यासंदर्भात शिवाजीराव पाटील यांनी २०१५ मध्ये भुसावळ न्यायालयात जुगल पाटील यांच्याविरूध्द केस दाखल केली आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना २०१८ मध्ये जुगल पाटील यांनी वादग्रस्त गट नं. ३०८ मधील जामीन बिनशेती वापरण्यासाठी मंजूरी मिळविण्यासाठी १५ ऑक्टोबर २०१८ मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावात शिवाजीराव पाटील आणि त्यांची पत्नी शोभा शिवाजीराव पाटील यांच्या बनावट सह्या केल्या होत्या. याबाबत शिवाजीराव पाटील यांनी औरंगाबाद येथील हस्ताक्षर तज्ञांकडून पडताळणी केली असता दोन्ही सह्या शिवाजीराव व त्याच्या पत्नी शोभा पाटील यांच्या नसून बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शिवाजीराव पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीसात जुलग पाटील यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.