यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल आणि अंजाळे गावातील नागरीकांना घरकुलांचा लाभ मिळावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आज यांना देण्यात आले आहे.
यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातुन शासनाचा २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्यांना घर मिळावे यासाठी कालब्ध कार्यक्रम सर्वत्र राबविण्याचा मानस जाहीर केला आहे. शासनाच्या या महत्वकांशी अशा घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील खऱ्या लाभार्थी ग्रामस्थांना आपल्या हक्काचा निवारा मिळावा याकरिता वारंवार पंचायत समितीच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचा प्रकार यावल तालुक्यात उघड झाला आहे. घरकुलांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . शासकीय पातळीवर संपुर्ण देशात २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१या काळात महा आवास अभियान मोहीम सर्व ग्रामीण पातळीवर प्रभावीपणे राबविली जावी यासाठी खऱ्या अर्थाने प्रशासकीय यंत्रणेकडुन प्रयत्न होत नसल्याचे दिसुन येत आहे. तालुक्यातील बोरावल आणि अंजाळे या गावातील अनेक घरकुल हे अपुर्ण अवस्थेत आहेत. काहींच्या घरकुलांना अद्याप मान्यता मिळाली नसल्याचे दिसून येत आहे. बोरावल आणि अंजाळे या गावातील दारिद्रय रेषेखालील आदीवासी व इतर समाज बांधव राहणारे कुटुंब हे शासनाच्या कल्याणकारी योजनापासुन आजपर्यंत वंचीत का ? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष जनहीत चेतन अढळकर यांनी एका निवेदनाद्वारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस पाटील यांच्या समोर उपस्थित केला आहे. पंचायत समिती प्रशासनाने शासकीय मान्यताप्राप्त लाभार्थ्यांच्या यादी प्रमाणे घरकुलांचे लाभ न दिल्यास मनसेद्वारे सर्व लाभार्थ्यांना सोबत घेवुन चेतन अढळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला देण्यात आला आहे. निवेदनावर चेतन अढळकर, मनसे तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहरा अध्यक्ष किशोर नन्नवरे , विभागीय अध्यक्ष आबीद कच्छी , मनसे विद्यार्थी सेनेचे रोहन धांडे ,ऋषिकेश कानडे, अनिल सपकाळे यांच्यासह लाभार्थी लक्ष्मण बारेला, भिमसिंग बारेला, दयाराम बारेला, हेमचंद्र सुपडु चौधरी, जंगलु पवार, आरती बंवार आदी याप्रसंगी उपास्थि होते.