Home Cities जळगाव सुप्रिम कॉलनीतून अडीच लाखाचा ट्रक चोरट्यांनी लांबविला; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

सुप्रिम कॉलनीतून अडीच लाखाचा ट्रक चोरट्यांनी लांबविला; एमआयडीसी पोलीसात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत लावलेला अडीच लाख रूपये किंमतीचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,  सद्दाम हुसैन बशीर खान (वय-२९) रा. मास्टर कॉलनी मेहरूणी हे ट्रक चालक असून ट्रकला मिळलेल्या ट्रीपनुसार काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे टाटा कंपनीचा (एमएच १९ जे ३३२३) क्रमांकाचा ट्रक आहे. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांनी शहरातील सुप्रिम कॉलनी परीसरातील विरराम इंटरप्रायझेस कंपनीसमोरील मोकळ्या जागेवर लावला होता. १ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सद्दाम हुसैन हे ट्रकजवळ गेले असता ट्रक जागेवर मिळून आला नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध करूनही मिळून आला नाही. अडीच लाख रूपये किंमतीचा ट्रक चोरीस गेल्याचे लक्षात आले. एमआयडीसी पोलीसात धाव घेवून आज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिंन मुंढे करीत आहे. 


Protected Content

Play sound