Home क्राईम वाहतूक शाखेकडून विना परवाना ऑटो रिक्षांवर धडक कारवाई (व्हिडीओ)

वाहतूक शाखेकडून विना परवाना ऑटो रिक्षांवर धडक कारवाई (व्हिडीओ)


चाळीसगाव जीवन चव्हाण । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात विना परवाना रिक्षाधारकांची संख्या ही वाढत आहे. शहर वाहतूक शाखेकडून आज सिग्नल चौक व आर्यापार चौक येथून विना परवाना रिक्षाधारकांच्या ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी यावेळी सांगितले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून विना परवाना रिक्षाचालकांची गर्दी होत असल्याचे बाब लक्षात येताच वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी धडक कारवाई केली. यात सिग्नल चौक व आर्यापार चौक येथून ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या ऑटो रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सुतोवाच वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी केले. तसेच वाहनधारकांनी नियमांचे पालन करूनच वाहणे चालवावी असेही नमूद केले. या कारवाईत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलिस हवालदार रावते, अरूण बाविस्कर, आबा पाटील, जगताप मेजर, राजू निकम, विजय निकम, बापू पाटील, सोनवणे मेजर व शांताराम थोरात आदींचा समावेश आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/811990419442897

 


Protected Content

Play sound