Home आरोग्य सावधान : जिल्ह्यात आज ४०८ कोरोनाबाधित रूग्ण आढळले

सावधान : जिल्ह्यात आज ४०८ कोरोनाबाधित रूग्ण आढळले


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ४०८ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. तर आज १४३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह चोपडा आणि जामनेर तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

आजची आकडेवारी 

जळगाव शहर-१९१, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-२१, अमळनेर-२०, चोपडा-५२, पाचोरा-१३, भडगाव-५, धरणगाव-९, यावल-२, जामनेर-३३, रावेर-७, पारोळा-१२, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर-१८, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४०८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ६० हजार ८७८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५६ हजार ९८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५०५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील एका रूग्णाचा मृत्यू झाला असून आजवर १ हजार ३ ८५ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound