Home क्राईम भुसावळातल्या चाकू हल्ल्यातील जखमी तरूणाचा मृत्यू

भुसावळातल्या चाकू हल्ल्यातील जखमी तरूणाचा मृत्यू

0
27

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या जयेश दुधानी या तरूणाचा आज सकाळी उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.

याबाबतचे वृत्त असे की, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर २४ मार्च रोजी भारतीय जनता पक्षाचे पेज प्रमुख संमेलन आयोजित करण्यात आले होते. यानंतर याच दिवशी रात्री या मैदानावर साडेअकराच्या सुमारास काही तरूणांनी जयेश दुधानी या तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतांना जयेश दुधानीचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यातील आरोपींना आधीच अटक करण्यात आली असून आता त्यांच्यावर खूनाचे कलम वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound