Home क्राईम जळगावात व्यावसायिका लुटणार्‍या दोघांना शनिपेठ पोलिसांकडून अटक

जळगावात व्यावसायिका लुटणार्‍या दोघांना शनिपेठ पोलिसांकडून अटक

0
35

जळगाव प्रतिनिधी ।  शहरात बुट विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बाबुलाल डिगांबर निंबोरे (वय-७१, हे बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) या परप्रांतीय व्यावसायिकाला लुटल्याच्या गुन्ह्याचा शनिपेठ पोलिसांनी छडा लावला आहे. रिक्षाच्या क्रमांकावरुन संशयितांनी रिक्षाचालक ताब्यात घेवून त्याच्या साथीदारांना निष्पन्न केले आहे. रिक्षाचालक ईश्‍वर संतोष भाई रा. खंडेराव नगर, भोईवाडा यात अटक केल्यानंतर शनिवारी रात्री पोलिसांनी अमोल ईश्‍वर भोसले (वय २२ रा. सिध्दार्थ नगर पिंप्राळा हुडको ), यास अटक केली आहे. त्यास आज २७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बाबुलाल डिगांबर निंबोरे वय ७१ हे शहरात बुट विक्री व्यवसायानिमित्ताने ते आले आहेत. २० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजकमल चौक येथे रिक्षाची प्रतिक्षा करत होते. रिक्षा आल्यानंतर ते त्यात बसले. रिक्षात चौघे जण बसलेले होते. त्यातील एकाने खाली उतरुन निंबोरे यांना इतरांच्या मधोमध बसविले. राजकमल चौक ते पांडे चौकादरम्यान रिक्षातील चौघांनी निंबोरे यांच्या खिशातील ४ हजार ५०० रुपयांची रोकड व १ हजार १०० रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज बळीजबरीने काढून घेतला व यानंतर निंबोरे यांना बी.जे. मार्केटसमोर झिपरु अण्णा समाधी जवळ रिक्षातून उतरवून दिले आणि चौघे पसार झाले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

गुन्ह्यात संशयितांनी वापर केलेल्या रिक्षाचा एम.एच.१९ व्ही. ६६८१ असे असल्याचे निष्पन्न झाले. या क्रमाकांवरुन संशयितांनी रिक्षासह रिक्षामालक ईश्‍वर संतोष भाई यास ताब्यात घेतले. त्याने बंटी नंदू महाले रा. मयुर कॉलनी, अमोल ईश्‍वर भोसले, व राहूल नावाचा तरुण अशा तिघांसोबत गुन्हा केल्याची कबूली दिली. पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी ईश्‍वर भोई यास अटक करुन गुन्हयात रिक्षा जप्त केली. त्याला एक मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अमोल भोसले यास अटक केली. त्यास आज न्यायालयात हजर केले असता न्या. जी.जी.कांबळे यांनी त्यास १ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे ऍड. रंजना पाटील यांनी काम पाहिले. दरम्यान या गुन्ह्यात बंटी महाले व राहूल नावाचा तरुण हे दोघेही फरार असून त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.


Protected Content

Play sound