Home आरोग्य आ. राजूमामा भोळे कोरोना पॉझिटीव्ह; खासगी रूग्णालयात उपचार

आ. राजूमामा भोळे कोरोना पॉझिटीव्ह; खासगी रूग्णालयात उपचार

0
38

जळगाव प्रतिनिधी । जळगावचे आमदार तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जळगावचे आमदार तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.

आ. राजूमामा भोळे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेऊन स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


Protected Content

Play sound