भुसावळात मालगाडीचे तीन डबे घसरले; सिग्नल यंत्रणेची हानी ( व्हिडीओ )

 

 

4acca54b 4c88 487b 839d 299a9d37abf6

 

भुसावळ (प्रतिनिधी) येथील रेल्वेच्या सीवायएम कार्यालयासमोर मालगाडीचे तीन डबे घसरून रेल्वे रूळ, मुख्य विद्युत वाहिनीचे दोन खांब व सिग्नल यंत्रणेचे नुकसान झाल्याची घटना आज (दि.२८) दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास घडली.

रेल्वेच्या सीवायएम कार्यालयासमोर आज दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास अप मार्गावर मालगाडी पाचव्या रुळावरून रिसिविंग मार्शलिंग करीत असताना गाडीचे तीन डबे अचानक रुळावरुन घसरले. या अपघातात मुख्य वीज वाहिनी ओएचईचे दोन खांब व सिग्नलच्या एका खांबाचे नुकसान झाले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा हे आज भुसावळच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने रेल्वेचा कुणीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उशिरापर्यंत पोहोचू शकला नाही. घसरलेले मालगाडीचे डबे पुन्हा रुळावर आणण्याचे काम उशिरापर्यंत युद्धपातळीवर सुरू होते.

Add Comment

Protected Content