पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तहसिलदार हे जनतेत नेहमी हुकुमशाही पध्दतीने वागत असून काही समस्यांबाबत फोन केला असता फोन उचलत नाही. तसेच आम्हा लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे जनतेच्या समस्या घेऊन गेल्यावर नेहमी अरेरावीची व उध्दट भाषाशैलाचा वापरत करत असतात. त्यामुळे तहसिलदार यांचा मनमानी कारभार थांबविण्यासंदर्भात पं. स. सभापती वसंत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
मी मागासर्वीय व भटक्या जमातीतुन निवडुन आलो असुन माझ्याकडे भिल्ल, बौध्द व इतर विमुक्त जमातीचे लोक मोठ्या अपेक्षेने व आशेने त्यांची कामे घेऊन येतात. भिल्ल समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळणाबाबत येतात अशा वेळेस तहसीलदार व त्याच्या कार्यालयातील कर्मचारी गरीब लोकांकडुन त्यांच्या एजंट मार्फत पैशांची मागणी करत असतात.
लोक जेमतेम मोल मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करत असतात. अशात त्यांना तालुक्याच्या ठिकाणी ३ ते ४ वेळेस बोलावून त्यांची लुबाडणूक एजंट मार्फत होत असुन या एजंटाना सर्व कर्मचारी व अधिकारी सामील असुन ते त्या एजंटाची नावे सागंत असतात. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील मग तो साधा जातीचा दाखला असो किंवा शिधापत्रीका किंवा शैक्षणिक विद्यार्थ्यांचे दाखले, शेती उतारे नोंदी, उत्पादन दाखले तहसील कार्यालयातुन मिळणाऱ्या सर्व सेवा एजंटा मार्फत पुरविल्या जात असुन सामान्य जनतेची पिळवणूक व फसवणुक केली जात आहे. ही जनता माझ्याकडे संबंधित विभागाची तक्रार घेऊन येतात.
तरी मी संबंधित अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी या नात्याने समजविण्याचा प्रयत्न करीत असतो. तरीपण ते अधिकारी सांगतात. तहसीलदार यांनी सांगितले आहे. असे सांगतात बोलण्यास व भेटण्यास वेळ नाही तरीपण ते फोनसुध्दा उचलत नाही. अशा आषयाचे निवेदन पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना गेल्या १५ दिवसांपूर्वीच दिले असुन याबाबत जिल्हाधिकारी यांनी गोर – गरिब नागरिकांना होत असलेल्या त्रासाची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.