एरंडोल प्रतिनिधी । गेल्या वर्षभरापासून संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना रुपी राक्षसाने थैमान घातले होते.आपल्या जीवाची पर्वा न करता या विळख्यातून वाचवण्यासाठी शासकीय तसेच सामाजिक संस्थांकडून जिकरीचे प्रयत्न केले गेले.
एरंडोल शहरातून देखील ज्यांनी कोरोना काळात आपले योगदान दिले अशा काही कोरोना योद्ध्यांना वेळोवेळी राजकीय व सामाजिक संस्थांकडून प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. परंतु अशा वेळेस खरे मेहनत करणारे सत्कारापासून वंचित राहिले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाबद्दल समाज मनात मोठी भीती होती, अशा वेळेस कोणी लवकर मदत करण्यास देखील सामोरे येत नव्हते तसेच सोशल मीडिया वरून येणाऱ्या अफवांमुळे देखील जनतेच्या मनात भीती निर्माण झाली होती. सुरुवातीच्या काळात प्रशासनाकडे देखील नागरिकांना समजवण्यासाठी किंवा खबरदारीसाठी पुरेसे मनुष्यबळ नव्हते. म्हणून एरंडोल शहरातील माजी सैनिक व म्हणून एरंडोल शहरातील माजी सैनिक व १८ ते २५ गटातील २५ते ३० युवकांनी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या बरोबरीने रस्त्यावरचा बंदोबस्त असो किंवा कंटेनमेंट झोनच्या बंदोबस्तासाठी हाय रिस्क झोनमध्ये आपल्या आरोग्याची पर्वा न करता स्वतःच्या बचावासाठी पुरेसे साधन नसताना अहोरात्र मेहनत घेतली. यावेळी आपल्या जिवाची पर्वा न करता व कुठ लाही लाभ लोभ नसतांना फक्त लोककल्याणासाठी प्रशासनाच्या बरोबरीने या कोरोना योध्यांनी काम केले.
कालांतराने कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी यांचा विविध राजकीय व काही सामाजिक संस्थांनी प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार केला. परंतु याप्रसंगी माजी सैनिक व त्या युवकांचा कोणीही सत्कार अथवा कोरोना योध्याचे प्रशस्तीपत्र दिले नाही. याबद्दल शहरातील सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.