Home आरोग्य शहरात विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई (व्हिडिओ)

शहरात विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई (व्हिडिओ)

0
26

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाची वाढती संख्या पाहता शहरात महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई प्रभाग समिती अधिकारी व्ही. ओ. सोनवणी व त्यांचे पथक  टाॅॅवर चौकात करीत आहेत. 

मागील आठवड्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या वाढत असल्याने  नागरिकांनी मास्क शिवाय घरातून निघू नये, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. यानुसार महापालिकेतर्फे विविध भागात पथक कार्यरत करण्यात आलेले आहेत. यातील एका पथकाने टाॅॅवर चौकात काही वाहनचालक विना मास्क जात असतांना  त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाई दरम्यान काही नागरिक पथकाशी हुज्जत घालत होते. विना मास्क असणाऱ्या नागरिकांचा मोबाईलद्वारे फोटो काढण्यात येत होता.  आपण मास्क लावला होता असा बनाव करणाऱ्यांना पथकाने मोबाईलद्वारे काढलेले फोटो दाखविण्यात येत होते. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/421358895820655

 


Protected Content

Play sound