रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाल येथे मद्यधुंद पतीने पत्नीवर कुर्हाडीने वार केल्याची घटना घडली असून त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
बिरबल गुरुमुख चव्हाण (रा. आंबेहोळ, ता. जामनेर) हा त्याची पत्नी मीराबाई चव्हाण हिच्यासह झिरण्या (मध्य प्रदेश) येथे लग्नाला गेला होता. तेथून पाल येथे नातेवाईकांकडे मुक्कामी होता. यावेळी दारू पिऊन तो पत्नीशी भांडण करत असताना त्याच्या पत्नीने दारू पिऊन भांडण करू नका, असे म्हटल्याने बिरबल याने कुर्हाडीने मीराबाईवर कुर्हाडीचा वार केला. यात ती जखमी झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी जगदीश सुरा चव्हाण, रा.पाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिरबल चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. पुढील तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे करत आहेत.