जळगाव प्रतिनिधी । शहरातील दोन पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरफोडी करणार्याला जालना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
जालना एलसीबीच्या पथकाने पवन उर्फ भुरा रामदास आर्या (रा. इंदूर, मध्य प्रदेश) याला अटक केली असून त्याने ठिकठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. यात जळगाव एमआयडीसी तसेच जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील घरफोड्यांचा समावेश असल्याचे त्याने सांगितले आहे.
त्याच्याकडून दोन कार, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगावात एमआयडीसी व जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने १ फेब्रुवारी रोजी घरफोड्या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.