रावेर प्रतिनिधी । जिल्हात वृध्द कलावंताचे अनेक वर्ष प्रलंबित प्रकरणे अखेर मार्गे लावण्यासाठी समितीची पहीलिच बैठक पार पडली. यात विविध कलावंताचे शंभर प्रकरणाला अंतरीम मंजूरी देण्यात आली.
बैठक वृध्द साहित्यिक कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष ह.भ.प गौप्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. नव्याने वृध्द कलावंत समिती गठीत झाल्या नंतर प्रथमच या समितीची बैठक जळगावात संपन्न झाली. यापूर्वी २००१ पासुन विविध वृद्ध कलावंताचे प्रकरणे प्रलंबीत होते. परंतु नव्याने गठित झालेल्या ह.भ.प गौप्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांच्या अध्यक्षीय समितीने तब्बल शंभर प्रकरणे मंजूरी दिल्याने सर्व वृध्द कलावंतांमधुन समाधान व्यक्त होत आहे. याबद्दल हभप गजानन महाराज यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की जळगाव जिल्हाची लोकसंख्या खुप असून यात वृद्ध कलावंताची संख्या जास्त आहे. आम्हाला प्रत्येक बैठकीला फक्त शंभर प्रकरणेच मंजूर करण्याचा अधिकार आहे. शासनाने जळगाव जिल्हाला अजुन ५० प्रकरणाचा कोटा वाढवून द्यावा. सद्या प्रत्येक तालुक्याला फक्त पाच ते सहा प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार आहे. हा कोटा शासना कडून वाढवुन देण्याची आम्हाला अपेक्षा असल्याचे हभप गजाजन महाराज वरसाडेकर यांनी सांगितले.