Home Cities जळगाव खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाचा संसर्ग

खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाचा संसर्ग


 

जळगाव: प्रतिनिधी ।  रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

 

बुधवारी रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

 

खासदार रक्षा खडसे  यांच्या  संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. रक्षा खडसे यांनी तीन दिवसांपूर्वी वाढीव वीज बील, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन मुक्ताईनगर येथे आंदोलन केले होते.


Protected Content

Play sound