अमळनेर प्रतिनिधी । दीक्षा विधीच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला फलक उतारल्या प्रकरणी येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर येथील जैन समाजातर्फे दीक्षा समारंभाच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकाला १६ रोजी रात्री काढण्यात आल्यानंतरचा वाद आता चिघळला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेरच्या दादावाडी जैन संघाचे अध्यक्ष संजय त्रिलोकचंद जैन यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १६ रोजी स्टेशन रोडवर रात्री साडेआठ वाजता उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड हे तीन कर्मचार्यांसह आले. त्यांनी बॅनर काढले व जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी केली. यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात गायकवाड व तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश परदेशी करत आहेत.